कुलभूषण यांच्या सुटकेसाठी अनिवासी भारतीयांचा पुढाकार

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

वॉशिंग्टन: पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आता अनिवासी भारतीयांनी पुढाकार घेतला आहे.

वॉशिंग्टन: पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आता अनिवासी भारतीयांनी पुढाकार घेतला आहे.

अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी याप्रकरणी व्हाइट हाउसच्या संकेतस्थळावर याचिका दाखल करत ट्रम्प प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कुलभूषण यांना शिक्षा सुनावताना ठेवलेले आरोप हे तथ्यहीन व पूर्णपणे चुकीचे असून, यामुळेच त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाकिस्तान प्रतिसाद देत नाही. जो गुन्हा जाधव यांनी केलाच नाही. त्याची शिक्षाही त्यांना होता कामा नये, यासाठी ट्रम्प प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा, असेही याचिकेत नमूद आहे.
या याचिकेवर ट्रम्प प्रशासनाकडून प्रतिसाद मिळण्यासाठी त्यावर 14 मे पर्यंत एक लाख नागरिकांची स्वाक्षरी होणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Non-Resident Indians Initiative for the release of Kulbhushan

टॅग्स