इराणचा ‘नूर’ अवकाशात

noor satellite
noor satellite

तेहरान - इराणच्या पहिल्या लष्करी उपग्रहाचे बुधवारी प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती रेव्होल्यूशनरी गार्ड कडून देण्यात आली. इराणने अवकाश कार्यक्रमाची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली होती. इराणने या माध्यमातून अमेरिकेला धक्का दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेल्या लष्करी उपग्रहाचे नाव ‘नूर’ (प्रकाश) असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या माहितीची स्वतंत्रपणे खातरजमा करण्यात आलेली नाही. इराणच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या वृत्तावर लगेचच प्रतिक्रिया देण्यास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय आणि पेंटॅगॉनकडून नकार देण्यात आला. 

इराण बरोबरच्या अणू करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर इराण अधिकच आक्रमक झाला आहे. उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळे आंतरखंडीय क्षेपणास्त्रासाठीची यंत्रणा इराण विकसित करू शकतो अशी चिंता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
अणू करारातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर इराणला अडचणीत आणण्याची एकही संधी अमेरिकेने सोडलेली नाही इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डच्या प्रमुखाच्या वाहनांच्या ताफ्यावर बगदाद विमानतळाच्या बाहेर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला घडवून आणला होता. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com