उ.कोरियाकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

उत्तर कोरियाची ही चाचणी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले गेलेले आव्हान असल्याची प्रतिक्रिया दक्षिण कोरियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या आक्रमक धोरणामुळे या भागामधील राजनैतिक
तणाव वाढत चालला आहे.

प्योंगयांग - उत्तर कोरियाकडून "बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. "जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणाऱ्या या मध्यम ते मोठ्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची' यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी माध्यमांनी दिले आहे.

"पुकगुक्‍सॉंग 2' या या क्षेपणस्त्राचा वापर अण्वस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो, असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. उत्तर कोरियाची ही चाचणी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले गेलेले आव्हान असल्याची प्रतिक्रिया दक्षिण कोरियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी विनंती अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाकडून करण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या आक्रमक धोरणामुळे या भागामधील राजनैतिक
तणाव वाढत चालला आहे.

Web Title: North Korea claims a successful ballistic missile test