उत्तर कोरिया बुडविणार अमेरिकेची विमानवाहू नौका?

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

प्योंगयाँग : कोरियन द्विपकल्पाच्या दिशेने येणारी अमेरिकन विमानवाहू नौका बुडविण्याची तयारी उत्तर कोरियाने केली आहे, असे कोरियन माध्यमांनी म्हटले आहे. 

अमेरिकेची USS कार्ल विन्सन ही विमानवाहू युद्धनौका उत्तर कोरियाच्या दिशेने कुच करीत आहे. मात्र, एकाच हल्ल्यात ही नौका बुडविली जाऊ शकते, अशी टिपण्णी 'रोदाँग सिनमुन' या वृत्तपत्राने केली आहे. 'विन्सन'च्या नेतृत्वाखालील युद्धसज्ज सैन्याची तुकडी या आठवड्यात कोरियाच्या किनाऱ्यावर पोचण्याची शक्यता आहे. 

उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षाबद्दल अमेरिकेचा धोरणात्मक संयम आता संपत आला आहे, असा इशारा दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सागरी फौजा रवाना केल्या आहेत. उत्तर कोरियाने नुकतीच घेतलेली क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाली. आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करीत त्यांनी केलेले लष्करी संचलन यांनी यामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढला आहे. 
 
Web Title: North Korea ready to sink US aircraft carrier