उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र आमच्यापर्यंत पोहचू शकत नाही- ट्रम्प

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

उत्तर कोरियाने नुकतेच स्पष्ट केले होते, की आम्ही अमेरिकेच्या भूभागापर्यंत पोहचण्यासाठी अण्वस्त्र विकसित करत आहोत. मी असे होऊ देणार नाही.

वॉशिंग्टन - उत्तर कोरिया असे कोणतेच अण्वस्त्र बनवू शकत नाही, जे अमेरिकेच्या भूभागापर्यंत पोहचू शकेल, असे वचन अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. 

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी नुकतेच उत्तर कोरिया दुसऱ्या खंडापर्यंत मारा करणारे अण्वस्त्रे विकसित करत असल्याचे म्हटले होते. किम जोंग यांनी हे वक्तव्य करत अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. किम जोंग यांच्या वक्तव्याला ट्रम्प यांनी उत्तर दिले आहे.

ट्रम्प म्हणाले, की उत्तर कोरियाने नुकतेच स्पष्ट केले होते, की आम्ही अमेरिकेच्या भूभागापर्यंत पोहचण्यासाठी अण्वस्त्र विकसित करत आहोत. मी असे होऊ देणार नाही. उत्तर कोरियाला अण्वस्त्रधारी देश म्हणून आम्ही कधीच स्वीकार करू शकत नाही. 

अमेरिकेने अण्वस्त्रांबाबत आपली क्षमता वाढविली पाहिजे. तसेच अण्वस्त्रांचा विस्तार केला पाहिजे, असे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. 

Web Title: north korea would not develop a nuclear missile able to reach us territory says donald trump