उत्तर कोरियावरील निर्बंध हटवावेत 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज यशस्वी बैठक झाल्यानंतर चीनने उत्तर कोरियावरील निर्बंध हटविण्याचे आवाहन केले आहे. 

बीजिंग : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज यशस्वी बैठक झाल्यानंतर चीनने उत्तर कोरियावरील निर्बंध हटविण्याचे आवाहन केले आहे. 

उत्तर कोरियाने अनेकदा अण्वस्त्र चाचण्या घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने आणि अमेरिकेने त्यांच्यावर कठोर निर्बंध घातले होते. हे निर्बंध दूर करून उत्तर कोरियाला विकासाची संधी द्यावी, अशी मागणी त्यांचा एकमेव पाठीराखा असलेल्या चीनने केली आहे. "आर्थिक निर्बंध टाकणे हा एकमेव उपाय असू शकत नाही, असे आमचे पूर्वीपासूनचे मत आहे.

उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय नियम आणि अटींचे पालन केल्यास त्यांच्यावरील निर्बंध शिथिल अथवा कमी केले जाऊ शकतात, असे राष्ट्रसंघाने म्हटले आहे. त्यामुळे आजच्या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रसंघाने उत्तर कोरियाला पाठबळ देणे आवश्‍यक आहे,' असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.

Web Title: North Koreas restrictions should remove