पाकला मदत करून मूर्खपणा केला : ट्रम्प 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

गेल्या वर्षभरात अमेरिकेने पाकिस्तानला अनेकदा कडक इशारे देत मदत बंद करण्याचा इशारा दिला होता. तसेच संरक्षण भागीदार म्हणून असलेला दर्जा काढून घेण्याचीही धमकी दिली होती.

वॉशिंग्टन  : "पाकिस्तानला मागील पंधरा वर्षांत 33 अब्ज डॉलरची मदत करून अमेरिकेने मूर्खपणा केला आहे,' असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्‌विटरद्वारे आपली पाकिस्तानबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. "आम्ही केलेल्या मदतीच्या बदल्यात त्यांनी आमच्या लोकांना बावळट ठरवत आम्हाला केवळ धोका दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये आम्ही ज्यांच्या मागावर होतो, त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला; मात्र आता नाही,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेने पाकिस्तानला अनेकदा कडक इशारे देत मदत बंद करण्याचा इशारा दिला होता. तसेच संरक्षण भागीदार म्हणून असलेला दर्जा काढून घेण्याचीही धमकी दिली होती. तरीही पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठबळ देणे थांबविले नसल्याने अमेरिका प्रचंड नाराज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nothing but lies and deceit Trump launches Twitter attack on Pakistan