कादंबरीतून उलगडलं कोरोनाचं हे धक्कादायक रहस्य!

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

१९८१मध्ये प्रकाशित झालेली एक कादंबरी या कोरोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही कादंबरी का चर्चेत आली, कोरोनाचा आणि या कादंबरीचे कनेक्शन काय?

वुहान : कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात थैमान घातलेले असतानाच या व्हायरसबद्दल निरनिराळ्या रहस्यमयी गोष्टीही आता पुढे येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत १७००हून अधिक बळी घेतलेल्या कोरोनाबाबत यापूर्वीच भाकीत घडल्याचे सांगितले जात आहे. १९८१मध्ये प्रकाशित झालेली एक कादंबरी या कोरोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही कादंबरी का चर्चेत आली, कोरोनाचा आणि या कादंबरीचे कनेक्शन काय?

Coronavirus : कोरोनाचे थैमान; पण मृतांच्या संख्येत...

Image result for the eyes of darkness

१९८१ मध्ये 'द आईज ऑफ डार्कनेस' या नावाची कादंबरी प्रकाशित झाली होती. या कादंबरीत स्पष्टपणे लिहिले होते की २०२० मध्ये एक साथीचा रोग पसरला जाईल, या रोगामुळे घसा व फुफ्फुसांचे संक्रमण होईल. तसेच या रोगाची लागण एकाच वेळी अनेक जणांना होईल. तसेच या कादंबरीत वुहान 'वेपन ४००' हा शब्दही वापरला गेला होता. प्रसिद्ध अमेरिकन लेखक डीन कुंटज यांनी ही कादंबरी लिहिली आहे. त्यामुळे या लेखकाला या रोगाबाबत ४० वर्षांपूर्वीच कळले होते का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

Image result for the eyes of darkness

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल मीडियावर या पुस्तकाचे पान व्हायरल झाले आहे. डॅरेन प्लेमाऊथ यांनी शेअर केलेल्या या फोटोत वुहानमधील सद्यस्थितीचे वर्णन केले आहे. हे वर्णन वाचून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही जण हा केवळ योगायोग असल्याचे म्हणत आहेत, तर काही जणांनी ही भविष्यवाणी खरी झाल्याचे म्हणले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Novel predicted Wuhan virus 40 years before Coronavirus outbreak