पुलवामातील हुतात्म्यांना अमेरिकेत श्रद्धांजली 

पुलवामातील हुतात्म्यांना अमेरिकेत श्रद्धांजली 

वॉशिंग्टन ः जम्मू आणि काश्‍मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी विविध शहरांमध्ये आयोजित कार्यक्रमांत श्रद्धांजली अर्पण केली.

पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना तातडीने न्यायासनासमोर आणून हुतात्मा जवानांना न्याय मिळवून द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

रविवारी 9/11 स्मृतिस्थळाच्या परिसरात एकत्र येत भारतीय वंशाच्या शेकडो अमेरिकी नागरिकांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. हा हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारत आणि अमेरिकेला जगातील सर्व देशांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंतीही या वेळी करण्यात आली. नॅपरव्हिले, इलिनॉईससह वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, सिलिकॉन व्हॅली, लॉस एंजेलीस, ह्युस्टन आणि फोनिस्क आदी ठिकाणी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर याला संयुक्तराष्ट्रांनी (यूएन) जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणीही या वेळी अमेरिकेतील भारतीय समुदायाकडून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com