...तर एनएसजीत पाकलाही प्रवेश हवाच: चीन

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

बीजिंग - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारतास देण्यात आले; तर त्याच न्यायाने पाकिस्तानलाही एनएसजीमध्ये प्रवेश दिला जावा, अशी भूमिका चीनमधील कमुनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या माध्यमामधून आज (मंगळवार) व्यक्‍त करण्यात आली.

बीजिंग - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारतास देण्यात आले; तर त्याच न्यायाने पाकिस्तानलाही एनएसजीमध्ये प्रवेश दिला जावा, अशी भूमिका चीनमधील कमुनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या माध्यमामधून आज (मंगळवार) व्यक्‍त करण्यात आली.

"एसएसजीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे; मात्र त्याचवेळी भारत पाकिस्तानला या गटामध्ये प्रवेश न देण्यासंदर्भात प्रयत्न करत आहे. आण्विक तंत्रज्ञानाच्या प्रसारासंदर्भात पाकिस्तानची कामगिरी खराब असल्याचे भारताकडून सांगण्यात य्येत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा प्रसार पाकिस्तानचे तत्कालीन मुख्य आण्विक शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांनी केला होता. आण्विक तंत्रज्ञानाचा प्रसार हे काही पाकिस्तानचे अधिकृत धोरण नाही,‘‘ असे ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये म्हटले आहे.
 
""खान यांना काही वर्षांच्या नजरकैदेनंतर येथील सरकारकडून शिक्षा करण्यात आली. तेव्हा एनपीटी (अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा) आणि एनएसजीमधून भारतास सूट देण्यात येत असेल; तर अशी सूट पाकिस्तानलाही देण्यात यावी. एनएसजीमध्ये पाकिस्तानला वगळून भारतास प्रवेश देण्यास चीन व इतर काही देशांचा विरोध आहे. कारण यामुळे भारताच्या समस्येचे निराकरण होईल; मात्र त्यापेक्षाही मोठी समस्या उभी राहिल. तेव्हा भारताने पाकिस्तानबरोबरच एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्याची तयारी दर्शविणे हे समंजसपणाचे आहे,‘‘ असे मत या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. या लेखाचे शीर्षक "चायना नो बॅरियर टू इंडिया जॉईनिंग एनएसजी‘ असे आहे.

Web Title: NSG pakistan entry India : china