अण्वस्त्र बंदीबाबतच्या परिषदेपासून भारत दूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

परिषद उपयुक्त नसल्याच्या भूमिकेवर ठाम, बड्या देशांचाही विरोध

न्यूयॉर्क: जागतिक अण्वस्त्र बंदीबाबतच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सध्या सुरू असलेल्या परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अण्वस्त्रधारी काही देशांचा या परिषदेला आक्षेप असल्याने भारताने या परिषदेपासून दूर राहण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अण्वस्त्र बंदीबाबतही ही परिषद गेल्या वीस वर्षांमध्ये प्रथमच होत आहे.

अण्वस्त्रांवर बंदी आणण्याबाबतचा करार बंधनकारक करण्याबाबत गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये राष्ट्रसंघाच्या आमसभेत चर्चा होऊन याबाबत परिषद घेण्यास 120 हून अधिक देशांनी सहमती दर्शविली होती. जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणून या परिषदेकडे पाहिले जाते. या ठरावावेळी ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेने ठरावाविरोधात मतदान केले होते, तर चीन, भारत आणि पाकिस्तान यांनी मतदानात सहभाग घेतला नव्हता. अण्वस्त्र बंदी करण्यास ही परिषद उपयुक्त ठरण्याबाबत साशंकता असल्याचे मत भारताने त्या वेळी व्यक्त केले होते. त्यामुळे आपल्या या भूमिकेशी ठाम राहत भारताने कालपासून (ता. 27) सुरू झालेल्या या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या भारताच्या मित्रदेशांसह इतर चाळीस देशांचा या परिषदेला विरोध असल्यानेही भारताने दूर राहण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Nuclear ban Council and India