जगभरात कोरोनाचा हाहाकार कायम; अशी आहे सद्यस्थिती...

जगभरात कोरोनाचा हाहाकार कायम; अशी आहे सद्यस्थिती...

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. असे असताना अमेरिका, इटली, चीन, ब्राझीलसह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात तब्बल 84,25,645 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 44,34,075 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ब्राझील, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सरकारे उपाययोजना करत आहेत. 'वर्ल्डोमीटर्स' या वेबसाईटनुसार, जगभरात आत्तापर्यंत 4,51,831 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 44 लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

जगभरात 84 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. जगभरात 84,25,645 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये जवळपास 4,51,831 जणांचा मृत्यू झाला आहे. 44,34,075 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

भारतात 3,68,557 कोरोनाग्रस्त रुग्ण

भारतात आत्तापर्यंत 3,68,557 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 12,274 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,94,843 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अमेरिकेत 22,34,854 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर यामध्ये 1,19,943 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये वाढतीये मृतांची संख्या

अमेरिकेपाठोपाठ आता ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचे प्रमाण वाढत आहे. ब्राझीलमध्ये सध्या एकूण 9,60,309 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, तेथील मृतांचा आकडा हा 46,665 वर गेला आहे. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच आत्तापर्यंत 5,03,507 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com