माझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो...

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

आपण सर्वांनीच, नागरिकत्वाच्या या आनंददायी कार्यामध्ये स्वत:स झोकून द्यावयास हवे. केवळ निवडणूक असेल तेव्हाच नव्हे, आपल्या संकुचित हिताखातरच नव्हे; तर आयुष्यभरासाठी...

माझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो,

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या नव्या उमेदवारास मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी पत्र लिहिणे ही (आपल्या देशाची) एक मोठी परंपरा आहे. या पत्राच्या माध्यमामधून अमेरिकेच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेणाऱ्यास आत्तापर्यंत आपण आत्मसात केलेल्या, शिकलेल्या बाबींबद्दल अवगत करणे हा या पत्राचा उद्देश असतो. याचबरोबर, अमेरिकेच्या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेऊन मुक्त जगाच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या या वारसदारास या आधीच्या शहाणपणाचा फायदा करुन देणे, हा हेतुही यामागे असतो.

मात्र अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिण्याआधी, अमेरिकेचा 44 वा राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत राहण्याचा बहुमान मला दिल्याबद्दल तुमचे आभार मानावयाची माझी इच्छा होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी निभावत असताना मी जे काही शिकलो आहे; ते सर्व तुमच्यामुळेच शिकलो आहे. तुमच्यामुळे मी एक चांगला राष्ट्राध्यक्ष बनु शकलो; तुमच्याचमुळे मी एक चांगला मनुष्य बनु शकलो आहे.

या आठ वर्षांच्या काळात, तुम्हीच माझ्यासाठी चांगुलपणा, कणखरपणा आणि आशेचा स्त्रोत होता. यापासूनच मला सतत सामर्थ्य मिळत राहिले. आपल्या आयुष्यामधील अत्यंत कठीण आर्थिक समस्येच्या काळात (देशातील) शेजारी व समाजांनी एकमेकांची काळजी घेतल्याचे मी पाहिले आहे. उत्तरांसाठी संघर्ष करणाऱ्या कुटूंबांसमवेत मी शोक व्यक्‍त केला आहे- आणि "चार्ल्सटन चर्च'मध्ये मला सौंदर्य सापडले आहे.

अमेरिकेच्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या लष्करामधील नवीन अधिकाऱ्यांच्या आशावादाकडे पाहून मला उभारी मिळाली आहे. मी आपल्या शास्त्रज्ञांना पक्षाघात झालेल्या रुग्णास स्पर्शाची जाणीव पुन्हा एकदा प्राप्त करुन देताना पाहिले आहे; त्यांना मी मृत्युसमोर हरलेल्या जखमी योद्‌ध्यांना पुन्हा एकदा चालण्याचे सामर्थ्य देतानाही पाहिले आहे. अखेर आरोग्य व्यवस्थेचा आधार मिळालेल्या अमेरिकन नागरिकांचे प्राण बचाविलेले मी पाहिले आहेत; आपल्याप्रमाणेच विवाहास अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे काही कुटूंबांच्या आयुष्याचा कायापालट झाल्याचाही मी साक्षीदार आहे. सहज कृती व दानशूरतेमधून निर्वासितांची काळजी घेणे; शांततेसाठी कार्यरत राहणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांची काळजी घेण्याचा संदेश घेणारी लहान बालके मी पाहिली आहेत.

दयाळू, उत्तम विनोदबुद्धी, निग्रह असलेले सुसंस्कृत अमेरिकन नागरिक पाहिले आहेत. नागरित्वाच्या तुमच्या दैनंदिन कृतींमधून आपले भविष्य उलगडताना मी पाहिले आहे.

आपण सर्वांनीच, नागरिकत्वाच्या या आनंददायी कार्यामध्ये स्वत:स झोकून द्यावयास हवे. केवळ निवडणूक असेल तेव्हाच नव्हे, आपल्या संकुचित हिताखातरच नव्हे; तर आयुष्यभरासाठी...

या मार्गामधील प्रत्येक पावलावेळी मी तुमच्याबरोबरच असेन

... आणि जेव्हा अमेरिकेच्या प्रगतीचा वेग मंदावल्यासारखे भासेल; तेव्हा अमेरिका हे केवळ एकाच व्यक्‍तीचे कार्य नाही, याचे स्मरण ठेवा. आपल्या लोकशाही व्यवस्थेमधील सर्वांत सामर्थ्यशाली शब्द म्हणजे - आपण.

"होय आपण". "आपण संकटांवर मात करु'.

होय. आपण हे करु शकतो (येस, वुई कॅन)

- बराक ओबामा 

Web Title: Obama's last letter to America