ओमिक्रॉनची लाट : चीनमध्ये लॉकडाउनच्या नावाखाली मानसिक छळ

झिरो कोविड धोरणाची नागरिकांत धास्ती
Omicron wave Mental persecution in China guise of lockdown Beijing
Omicron wave Mental persecution in China guise of lockdown Beijingsakal

बीजिंग : शांघायसह अन्य शहरात कोरोना लॉकडाउनच्या नावाखाली नागरिकांचा मानसिक छळ केला जात आहे. झिरो कोविड धोरणावर टीका करणाऱ्यांना अध्यक्ष शी जिनिपिंग यांनी इशारा दिला आहे. चीनमध्ये अनेक भागात कडक लॉकडाउन लागू असताना नागरिकांत तीव्र संताप पाहावयास मिळत आहे. अनेक शहरात आंदोलन देखील होत आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने काल अध्यक्ष शी जिनिपिंग यांच्या झिरो कोविड धोरणाला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या धोरणाला विरोध करणाऱ्या किंवा मान्य न करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे.

यादरम्यान चीनमध्ये गेल्या चोवीस तासात ४६२८ नवीन रुग्ण आढळून आले तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिलपासून शांघाय शहर पूर्णपणे बंद करण्यात आले असून चार जणांच्या कुटुंबांना घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ पीसीआर चाचणीसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. शांघायमधील लोकांकडील खाण्यापिण्याचे सामान संपले आहे. सरकारकडून दिले जाणारी खाद्यसामग्री देखील पुरेशी ठरताना दिसून येत नाही. बीजिंगमध्ये शांघायप्रमाणेच लॉकडाउन लागू होऊ नये यासाठी व्यापक चाचणी केली जात आहे. गुआनझाओ येथे केवळ एक संशयित प्रकरण आल्यानंतर विमानसेवा बंद करण्यात आली. तसेच ५६ लाखाहून अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली. लॉकडाउन असलेल्या भागात पीपीई किट घातलेले पोलिस आणि कर्मचारी हे लोकांची जबरदस्तीने चाचणी करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांनी नाराजीचा सूर आळवत या कर्मचाऱ्यांना ‘व्हाइट गार्ड्स’ असे नाव दिले आहे.

जबरदस्तीने क्वारंटाइन

लॉकडाउनच्या काळात चीन सरकारकडून देखरेखीसाठी रोबोटिक कुत्रा आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यामुळेही लोकांत नाराजी आहे. रोबोटिक कुत्रा आणि ड्रोनच्या माध्यमातून लोकांना इशारा दिला जात आहे. गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. एवढेच नाही तर नागरिकांना जबरदस्तीने क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवले

जात आहे.शांघायच्या बिकाई भागात सुमारे हजार लोकांना विलगीकरण कक्षात पाठवले आहे. त्यांच्या घरांचे सॅनिटायजेशन केले जात आहे. एका व्यक्तीने म्हटले की, आमच्या मनात या संसर्गापेक्षा लॉकडाउनची भीती अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com