बीजिंगमध्ये आतापर्यंत झाल्या एकतृतीयांश चाचण्या

सोमवार, 29 जून 2020

अन्शीन परगणा सील बीजिंगपासून १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबेई प्रांतातील अन्शीन परगण्यात १३ रुग्ण आढळले. त्यामुळे सुमारे चार लाख नागरिकांची वस्ती असलेला परगणा सील करण्यात आला. हे रुग्ण बीजिंगमधील शीनफादी घाऊक बाजारपेठेशी संबंधित आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बीजिंगमध्ये रुग्ण आढळू लागले. संसर्गाची तीव्रता गंभीर असल्यामुळे कडक पावले उचलली जात आहेत. प्रत्येक खेड्यात प्रत्येक इमारतीमधील नागरिकांना तातडीने निर्बंध लागू झाले.

बीजिंग - कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्‍यात आणण्यासाठी बीजिंगमध्ये चाचण्यांवर जोर देण्यात आला आहे. शीनफादी घाऊक बाजारपेठेत रुग्ण आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्याच्या उद्देशाने बीजिंगमध्ये व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सुमारे शंभर विद्यापीठांतील एक लाखाहून जास्त विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची न्यूक्‍लीक ॲसिड टेस्ट घेण्याची मोहीम सुरू झाली. दरम्यान, अन्शीन परगणा सील करण्यात आला आहे.

...आता या देशाने उठविले देशातील पूर्ण लॉकडाउन

बीजिंगमध्ये सामूहिक चाचण्यांवर जोर देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ७० लाखांहून जास्त नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शीनफादी घाऊक बाजारपेठ, बॅंका, वाहतूक, भोजन सुविधा, ब्यूटी पार्लर, कुरिअरसेवा येथील कर्मचारी आणि कामगारांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

नागरिकांना सल्ला देणारे डोनाल्ड ट्रम्प स्वत: मास्क का वापरत नाहीत? जाणून घ्या कारण...

विद्यार्थ्यांसाठी २० वैद्यकीय केंद्रे उघडण्यात आली आहेत. रविवारी मध्यरात्रीपर्यंत चाचण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. पुढील टप्प्यात उर्वरित शिक्षण क्षेत्रातील सुमारे तीस लाख लोकांच्या चाचण्या होतील.

चाचण्यांवर जोर
८.२९ दशलक्ष स्वॅबचे नमुने
७.६९ दशलक्ष चाचण्या पूर्ण
४ लाख ५८ हजार रोजच्या चाचण्या