ट्रम्प यांना तालिबानचे खुले पत्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील अमेरिकी फौजांचे संख्याबळ वाढवू नये, तर फौजा मागे घ्याव्यात. अफगाणिस्तानमध्ये 16 वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे मुजाहिदने पत्रात म्हटले आहे. 

काबूल : अमेरिकेने अफगाणिस्तानमधून चालते व्हावे, असा संदेश देणारे "अनावृत पत्र' तालिबानने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवले आहे.

तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने इंग्रजीतील हे विस्तृत पत्र मंगळवारी (ता. 15) पत्रकारांना पाठवले. ट्रम्प यांनी आपल्या पूर्वसुरींच्या चुकांपासून धडा घेत अमेरिकेच्या अफगाणिस्तान व्यूहरचनेचा फेरआढावा घेण्याचे ठरवले आहे, असे तालिबानचे म्हणणे आहे.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील अमेरिकी फौजांचे संख्याबळ वाढवू नये, तर फौजा मागे घ्याव्यात. अफगाणिस्तानमध्ये 16 वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे मुजाहिदने पत्रात म्हटले आहे. 

Web Title: 'open letter' to Donald Trump, Taliban urges US to leave Afghanistan