विरोधकाला पाठिशी घालत ओबामांची समर्थकांवर चिडचिड

यूएनआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या समर्थनासाठी सभा घेत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज एका विरोधकाला पाठिशी घालत आपल्या समर्थकाला गप्प केले. नॉर्थ कॅरोलिना प्रांतात झालेल्या सभेवेळी हा प्रकार घडला.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत क्‍लिंटन यांना मत देण्याचे आवाहन ओबामा यांनी येथील आफ्रिकी अमेरिकी समुदायाच्या नागरिकांना केले. या वेळी ओबामा यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार नसल्याचे सांगितले. हे ऐकताच ट्रम्प यांच्या एका समर्थकाने निदर्शने करण्यास सुरवात केली. हा समर्थक त्याच्या गणवेशावरून माजी सैनिक वाटत होता. त्याच्या निदर्शनामुळे चिडून जात हिलरी समर्थकांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. ओबामा यांनी समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन करूनही परिस्थितीमध्ये फरक पडला नाही. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला. मग ओबामा यांनी आवाज वाढवत, "अमेरिकेमध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या व्यक्तीने लष्करात सेवा केल्याचे दिसत आहे. आपण त्यांचा आदर केला पाहिजे,' असे समर्थकांना सांगितले. मात्र, ओबामा यांनी आपल्याच समर्थकांवर आरडाओरडा केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: opposition party were Obama supporters and irritability