लादेनचा मुलगा अमेरिकेचा 'बदला' घेण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झालेला अल कायदाचा म्होरक्‍या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पुत्र वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची समोर आल्याचे एफबीआयच्या माजी एजंटाने सांगितले आहे.

लाहोर (पाकिस्तान) : अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झालेला अल कायदाचा म्होरक्‍या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पुत्र वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची समोर आल्याचे एफबीआयच्या माजी एजंटाने सांगितले आहे.

लादेनने 2001 साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान धडकवून मोठा हल्ला घडविला होता. या हल्ल्यात दोन हजार 966 जण ठार झाले होते. तर 6 हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले होते. 13 जुलै 2007 रोजी इस्लामाबादपासून 65 किमी अंतरावरील अबोटाबादमध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला होता. त्यानंतर अबोटाबादमध्ये छापा टाकण्यात आला होता. त्या छाप्यातील काही पत्रे नुकतीच उघड करण्यात आली आहेत.

या बाबत बोलताना एफबीआयचे माजी एजंट अली सौफनने एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली. लादेनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हमजा वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची तयारी करत आहे. त्याला अल-कायदाचा प्रमुख व्हायचे आहे आणि वडिलांची विचारसरणी पुढे घेऊन जायची आहे, अशी माहिती सौफन यांनी दिली. हमजाचे काही भाषणेही यापूर्वी उघड झालेले आहेत. 'लादेन आणि त्याच्या मुलामध्ये बरेच साम्य आहे, हे लादेनचे आणि त्याच्या मुलाचे भाषणे ऐकल्यावर समजते', असेही सौफन यांनी मुलाखतीत सांगितले.

मागील वर्षी हमजाने दोन भाषणांचे ऑडिओ रेकॉर्ड केले होते. त्यात त्याने अमेरिकन नागरिकांना इशारा दिला होता. 'अमेरिकन लोकांनो, आम्ही येत आहोत आणि तुम्ही ते अनुभवणार आहात. माझ्या वडिलांच्याबाबत तुम्ही जे काही केले आहेत त्याचा आम्ही बदला घेणार आहोत', असे भाषण हमजाने केले होते असे सौफन यांनी सांगितले.

Web Title: Osama bin Laden’s son plans to ‘avenge his father'