Oscars 2023 : जगातला पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण माहितीये l Oscars 2023 First Oscar Award Winners history interesting facts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscars 2023

Oscars 2023 : जगातला पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण माहितीये?

First Oscar Award Winners : ऑस्कर अकादमीचा ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. १९२९ ला याची स्थापना झाली होती. तेव्हापासून हा हॉलिवूडचा अविभाज्य भाग आहे. यासाठी दरवर्षी शेकडो चित्रपटांचं नामांकन पाठण्यात येतं. मात्र काही निवडक चित्रपटांनाच विविध श्रेणींंध्ये ऑस्कर पुरस्कार प्रदान केला जातो. याचा रंजक इतिहास तुम्हालाही थक्क करेल.

ऑस्करचा पहिला सोहळा

पहिला ऑस्कर सोहळा १९२९ मध्ये हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी केवळ २०० लोकांना त्याचं साक्षीदार होता आलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे एकूण १२ पुरस्कार देण्यात आले होते. विजेत्यांची घोषणा अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसने केली होती. ज्याची स्थापना १९२७ मध्ये करण्यात आली.

पहिला ऑस्कर पुरस्कार

  • 'द लास्ट कमांड' आणि 'द वे ऑफ ऑल फ्लेश' या दोन चित्रपटांमधील भूमिकेसाठी जर्मन अभिनेता एमिल जॅनिंग्ज यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवला होता.

  • तर अभिनेत्री जेनेट गेयनोरला 7th हेवन, स्ट्रीट एंजल, सनराईज चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

इतर पुरस्कारांप्रमाणे हा पुरस्कार सोहळापण वादविवादाशिवाय पूर्ण होत नाही. विविधता, प्रतिनिधीत्वाचा अभाव, पक्षपातीपणाचे आरोप अशा अनेक वाद या पुरस्कार सोहळ्या दरम्यान बघायला मिळतात.

पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी

भारताची पहिली ऑस्कर विजेती भानू अथैया होती. गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉश्चुम डिझाइनचा पुरस्कार मिळाला होता. भानू अथैया १९८३ च्या चित्रपटांचा भाग होती. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनेत्यासह इतर पाच ऑस्कर जिंकले होते.

विजेते कसे निवडले जातात?

सध्या या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्र, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, मूळ पटकथा आणि सिनेमॅटोग्राफी यासह २४ श्रेणी आहेत. नामनिर्देशन आणि विजेते मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसच्या अकादमीच्या सदस्यांनी निवडले आहेत. यात ९ हजाराहून जास्त उद्योग व्यावसायिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Oscar AwardoscarOscars