चीनमध्ये कोळसा खाणींत 2 स्फोट; 38 ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

बीजिंग- चीनमध्ये दोन वेगवेगळ्या कोळसा खाणींमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये किमान 38 खाणकामगार मृत्युमुखी पडले आहेत. 

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. तसेच, इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशात स्फोट झाल्यानंतर इतर अनेक लोक त्यामध्ये अडकले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

शिफेंग शहरातील युआनबाओशान भागात बाओमा माइनिंग कंपनी लिमिटेड येथे दुपारी स्फोट झाला. त्यामध्ये ही जीवितहानी झाल्याचे शिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीन प्रशासनाने शोध आणि बचतकार्याला सुरवात केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 
 
Web Title: Over 38 workers dead in two coal mine explosions in China