वुहानमध्ये कोरोनावर मात - जिनपिंग

पीटीआय
बुधवार, 11 मार्च 2020

जगभरात...

  • मृतांची एकूण संख्या ४ हजारांवर 
  • शंभराहून अधिक देशात १ लाख १० हजार नागरिकांना बाधा 
  • दक्षिण कोरियात १५० रुग्ण  
  • मंगोलियात पहिला रुग्ण 
  • दोन हजार अब्ज डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता  
  • हॉटेल दुर्घटनेतील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २० वर

बीजिंग/वुहान - जगभरात कोरोना व्हायरसचे संशयित वाढत असताना चीनमध्ये कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमध्ये संसर्गावर मात केल्याचा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज केला. कोरोना व्हायरसने चीनमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून थैमान घातले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अध्यक्ष शी जिनपिंग हे प्रथमच वुहानच्या भेटीवर आज इथे आले होते. शहरातील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही ते म्हणाले. 

Image may contain: 1 person, text

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शी जिनपिंग यांनी आज मास्क घालूनच वुहानमधील आरोग्य आणि सैनिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या डिसेंबरमध्ये करोना संसर्गाचे लक्षण दिसत होती, तेव्हा अध्यक्ष शी जिनपिंग कोणतीच हालचाल करत नसल्याची टीका चीनमधून केली जात होती. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली वुहान आणि अन्य ठिकाणी पसरणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. उपचाराचा आणि सुविधांचा त्यांनी वारंवार आढावा घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले.

No photo description available.

आजच्या भेटीत त्यांनी येथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेतली; तसेच रुग्णालयाची आणि स्वयंसेवी संस्थेची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान कोरोना व्हायरसचा सामना करत निर्णायक विजय मिळवल्याचे मत शी जिनपिंग यांनी नोंदविल्याचे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे ५ कोटी नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथील व्यवहार २३ जानेवारीपासून ठप्प पडलेले असताना तेथे आता कोरोनाच्या प्रसारावर अंकुश बसला आहे, असे शी जिनिपिंग यांनी दावा केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming Corona in Wuhan shi jinping