आपला प्रभाव वाढतोय! मुस्लिमबहुल देशांच्या संघटनेचे भारताला प्रथमच निमंत्रण

पीटीआय
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : मुस्लिमबहुल देशांची प्रभावी संघटना असलेल्या 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन'च्या (ओआयसी) परिषदेच्या उद्‌घाटनाच्या सत्रासाठी भारताला निमंत्रित करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या या बैठकीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

जगातील महत्त्वाच्या संघटनांमध्ये भारताचे महत्त्व वाढत असल्याचे या निमंत्रणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अबुधाबीमध्ये एक आणि दोन मार्चला ही 46 वी परिषद होणार आहे.

हे निमंत्रण म्हणजे भारतातील 18.5 कोटी मुस्लिमांची, भारताच्या विविधतेतील त्यांच्या योगदानाची आणि भारताने मुस्लिम जगतासाठी दिलेल्या योगदानाची दखल असल्याचे सांगत भारताने आनंद व्यक्त केला आहे.

या परिषदेसाठी भारताला प्रथमच विशेष अतिथी म्हणून निमंत्रण मिळाले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला राजनैतिक पातळीवर एकटे पाडण्याचा भारताचा प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे निमंत्रण मिळाले आहे.

'ओआयसी'ने आतापर्यंत विविध मुद्यांवर पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, काश्‍मीर मुद्यावरूनही ही संघटना त्यांच्याच बाजूने आहे. या परिषदेमध्ये सुषमा स्वराज भाषण करणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OYC invites India for the first time for a conference, Sushma Swaraj to attend