मुलीला वाजत होती थंडी; शेकोटीसाठी जाळल्या 14 कोटींच्या नोटा

वृत्तसंस्था
Tuesday, 7 January 2020

बँकेत पैसे ठेवत नसे

- न्यायालयात स्फोट

- तुरुंग म्हणून फाईव्ह स्टार हॉटेलच

बोगोटा : जगात कोण कोणासाठी काय करेल याचा काही अंदाज नाही. असाच एक प्रकार कोलंबियामध्ये घडला होता. त्यामध्ये एका व्यक्तीने आपली मुलगी आणि कुटुंबाला थंडी वाजत असल्याचे समजल्यानंतर त्याने चक्क तब्बल 14 कोटींच्या नोटा जाळल्या आणि त्याचीच शेकोटी केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

14 कोटींची शेकोटी करणारी ती व्यक्ती सर्वांत श्रीमंत कोकेन तस्कर पाब्लो एमिलो एस्कोबार गावेरिया ही आहे. फोर्ब्सच्या 1989 मधील यादीत त्याचे नाव जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये सातव्या क्रमाकावर होते. त्याने ड्रग्जमधून कोट्यवधींची कमाई केली होती. पाब्लो हा जगातील 80 टक्के देशात कोकेनचा पुरवठा करत होता. एका दिवसात 15 टन कोकेनचा पुरवठा त्याच्याकडून केला जात होता. त्यातूनच त्याला दिवसाला 40 कोटींचा फायदा होत होता.

Image result for pablo escobar

'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

बँकेत पैसे ठेवत नसे

पाब्लो हा इतका श्रीमंत असूनही त्याने कधी बँकेत पैसे ठेवले नाहीत. त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा होता की हा पैसा ठेवण्यासाठी त्याने चक्क गोडाऊनच तयार केले होते. या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बऱ्याच नोटा उंदीर कुरताडून टाकत असत. 

Image result for pablo escobar

न्यायालयात स्फोट

अमेरिकेतील तस्कर आपल्याविरोधात सुरु असलेला खटला सुरु असताना साक्षीदाराला गायब करत असत. मात्र, ज्यावेळी पाब्लोविरोधात खटला न्यायालयात सुरु होणार होता तेव्हा त्याने न्यायालयच स्फोटाने उडवून दिले. 

Image result for court

तुरुंग म्हणून फाईव्ह स्टार हॉटेलच

जेव्हा त्याला शिक्षा सुनावली जात असत. तुरुंगाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने तुरुंग म्हणून फाईव्ह स्टार हॉटेलच बांधले होते. तिथूनच तो आपले सर्व काळेधंदे चालवत असत. 

'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

तस्करीसाठी विमान

पाब्लो याचा तस्करीचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरु होता. त्याचा धंदा इतका मोठा होता, की तस्करीसाठी चक्क त्याने विमानाचीच खरेदी केली होती. 

Image result for pablo escobar

अवघ्या 20 वर्षांत श्रीमंत

पाब्लोचा तस्करीचा धंदा इतका वाढला होता की तो अवघ्या 20 ते 22 वर्षांतच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनला होता. 

माशांच्या पोटातून तस्करी

पाब्लो याने तस्करी केली होती. त्याने माशांच्या पोटातून तस्करी सुरु केली होती. माशांच्या पोटात कोकेन भरून तस्करी सुरु केले होते. 

Image result for Fish  big

1992 मध्ये हत्या

जेव्हा पाब्लो हा कमजोर झाला असे समजल्यानंतर कोलंबियाने अमेरिकेच्या दबावातून त्याला ठार मारले. ही कारवाई 1992 मध्ये करण्यात आली होती. 

Image result for pablo escobar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pablo escobar Burned for fire notes of 14 crores

Tags
टॉपिकस
Topic Tags: