Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावरून इम्रान खान यांची मोदींवर टीका; म्हणाले...

वृत्तसंस्था
Saturday, 29 February 2020

- दिल्लीतील हिंसाचारावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका. 

इस्लामाबाद : ईशान्य दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरु होता. त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये जे काही केलं तेच दिल्लीतही दिसत आहे, असे ते म्हणाले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिकजण जखमी झाले. आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. यावर इम्रान खान यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचा हिंदुत्त्वाचा अजेंडा 1930 च्या दशकात हिटलरने राबवलेल्या नाझीवादाप्रमाणेच आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्याचआधारे इम्रान खान यांनी त्यांच्यावर टीका केली. याबाबत इम्रान खान यांनी ट्विट केले.

650 जणांना अटक

दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु होता. मात्र, गुरुवारी हा हिंसाचार काही प्रमाणात थांबला आहे. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 650 जणांवर अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pak PM Imran Khan criticizes on modi over delhi violence issue