भारताच्या विरोधातील पुरावे "यूएन'मध्ये सादर करणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

इस्लामाबाद - भारतीय गुप्तहेर संघटनेचा (रॉ) सदस्य असल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांच्याकडून आम्ही अधिक पुरावे गोळा करत असून, त्यानंतर पाकिस्तानातील विध्वंसक कारवायांमध्ये भारताचा कसा हात आहे, याबाबतचे दस्तावेज आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन) सादर करू, असे पाकिस्तानने आज स्पष्ट केले.

पाकिस्तानी संसदेच्या स्थायी समितीसमोर बोलताना परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजिझ म्हणाले, की नियंत्रण रेषेवर भारताकडून कुरापती काढल्या जात आहेत. "रॉ'चा कथित सदस्य जाधव यांची सध्या चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून पाकिस्तानात भारत करत असलेल्या विध्वंसक कारवायांची माहिती घेतली जात आहे. जाधव यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर भारताच्या विरोधातील सर्व पुरावे "यूएन'कडे सादर करण्यात येतील; तसेच हे पुरावे इतर महत्त्वाच्या देशांकडेही सुपूर्त करण्यात येतील.

या वेळी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाझ अहमद चौधरी म्हणाले, की भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात 45 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून, भारताकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची माहिती "यूएन'ला दिली जाईल. काश्‍मीरबाबतच्या "यूएन'च्या ठरावांचे भारत उल्लंघन करतो आहे. या ठरावांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतावर दबाव वाढवावा, अशी मागणीही चौधरी यांनी केली.

Web Title: pak to present proofs agains india in uno