पाकला शेजाऱ्यांसोबत शांतता हवी : शरीफ

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

या बैठकीत शरीफ यांनी अन्य देशांसोबतच्या परराष्ट्रसंबंधांचा आढावा घेतला. पाकिस्तानचा शांततापूर्ण सहअस्तित्त्वावर विश्‍वास असून, अन्य देशांसोबत मजबूत परराष्ट्रसंबंध ठेवण्यावर आमचा भर असेल, असेही त्यांनी सांगितले.

इस्लामाबाद - भारतासोबच्या परराष्ट्रसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलाविली होती.

या बैठकीत शरीफ यांनी अन्य देशांसोबतच्या परराष्ट्रसंबंधांचा आढावा घेतला. पाकिस्तानचा शांततापूर्ण सहअस्तित्त्वावर विश्‍वास असून, अन्य देशांसोबत मजबूत परराष्ट्रसंबंध ठेवण्यावर आमचा भर असेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी शांतता, प्रगती आणि संपन्नता ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचेही नमूद केले.

Web Title: Pak wants peace with neighbors