पाक कुलभूषण जाधवला देणार नाही- अझीझ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

इस्लामाबाद- भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असून, त्याला आम्ही भारताच्या ताब्यात देणार नाही, असे परराष्ट्र सल्लागार सतराज अझीझ यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

इस्लामाबाद- भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असून, त्याला आम्ही भारताच्या ताब्यात देणार नाही, असे परराष्ट्र सल्लागार सतराज अझीझ यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

पाकिस्तानने जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक केली आहे. भारताचा हस्तक जाधव विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे अझीझ यांनी सभागृहात बोलताना सांगितले. जाधव यांना 'लाल गालिचा' आंथरून विशेष वागणूक देणार का? या प्रश्नावर बोलताना अझीझ म्हणाले, पाकिस्तानच्या विरोधात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल जाधव विरोधात गुन्हा दाखल केला असून, कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. शिवाय, भारताकडेही सोपविले जाणार नाही.

दरम्यान, जाधव हे भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत, असा खुलासा भारताने पाकिस्तानला दिला आहे. परंतु, पाकिस्तान ते मान्य करत नाही. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात आहे. हा मुद्दा आम्ही राष्ट्रसंघाच्या प्रमुखांसमोर मांडणार आहोत,'' असे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी म्हटले आहे.

Web Title: Pak Will Not Extradite Kulbhushan Jadhav: Sartaj Aziz