esakal | रशियाने पाकिस्तानसोबत मिळून भारताला दिला झटका!
sakal

बोलून बातमी शोधा

putin and imran khan

रशिया आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढत आहे

रशियाने पाकिस्तानसोबत मिळून भारताला दिला झटका!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- रशिया आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढत आहे. रशियन सैनिकांची एक तुकडी गुरुवारी संयुक्त सैन्य अभ्यासाठी पाकिस्तामध्ये पोहोचली आहे. पाकिस्तान आणि रशियाने या सैन्य अभ्यासाला  DRUHZBA-5 द्रजबा नाव दिलं आहे. पाकिस्तानी लष्कराने ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे. 

पाकिस्तान आणि रशियन सैन्यामध्ये पाचवा सैन्य अभ्यास होत आहे. हा अभ्यास दोन आठवडे चालेल. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी दोन्ही देशाचे सैनिक अभ्यास करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तानी माध्यमांनुसार, या सैन्य अभ्यासात स्काई डाईविंग आणि साथींना सोडवण्याचा सराव करण्यात येईल. पाकिस्तान आणि रशियामध्ये संयुक्त सैन्य अभ्यास द्रजबा दरवर्षी आयोजित केला जातो. 2016 पासूनच या अभ्यास घेतला जात आहे. यामध्ये दहशतवादविरोधी आणि विशेष सैन्य ऑपरेशनचाही समावेश असतो. 

व्वा! राष्ट्राध्यक्ष खोटं बोलत असल्याने टीव्ही चॅनेल्सनी लाईव्ह प्रसारण थांबवलं

रशिया आणि पाकिस्तानच्या सैन्य भागिदारीला भारताने विरोध केला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत सैन्य अभ्यास चुकीचा असून यामुळे समस्या अधिक वाढतील, असं भारताने म्हटलं आहे. रशियाने भारताच्या या विरोधाला केराची टोपली दाखवली आहे. याच वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने रशियाच्या असतराखान येथे कावकाज '2020' सैन्य अभ्यासात भाग घेतला होता. 2019 मधील सैन्य अभ्यासात कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनीही भाग घेतला होता.   

शीतयुद्धादरम्यान पाकिस्तान रशियाचा विरोधक असलेल्या अमेरिकेच्या गटात होता. त्यानंतरच्या काळात रशिया आणि पाकिस्तानची जवळीक वाढली आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रशियाने तालिबानसोबतही संपर्क वाढवला आहे. अफगाणिस्तानमध्ये नवी परिस्थिती निर्माण झाल्याने रशिया पाकिस्तानला महत्वाच्या भूमिकेत पाहात आहे. 2016 मध्ये अफगाणिस्तानप्रकरणी रशिया, पाकिस्तान आणि चीनने बैठक घेतली होती. दुसरीकडे अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध बिघडत चालले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली आहे. त्यामुळे पाकिस्तान रशिया आणि चीनसोबत आपले भविष्य पाहात आहे.

loading image
go to top