पाकिस्तानकडून 29 भारतीय मच्छिमार अटकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

इस्लमाबादः आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानने 29 भारतीय मच्छिमारांना आज (गुरुवार) अटक केली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यामुळे सागरी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाच बोटींसह 29 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानने गेल्या वर्षी 100 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. शिवाय, 19 बोटी जप्त केल्या होत्या.

Web Title: pakistan arrests 29 indian fishermen