"सागरी स्वातंत्र्यासाठी पाक कटिबद्ध'

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय सागरी सीमेमध्ये मुक्तपणे दळणवळण करण्याच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज सांगितले.

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय सागरी सीमेमध्ये मुक्तपणे दळणवळण करण्याच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज सांगितले.

37 देशांचा सहभाग असलेल्या "अमन' या नौदल सरावाला अरबी समुद्रामध्ये आज सुरवात झाली. अमेरिका, चीन आणि रशियासारख्या प्रमुख देशांच्या नौदलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. भारताने मात्र यामध्ये सहभाग घेतलेला नाही. दहशतवाद, अमलीपदार्थ व्यापार, मानवी तस्करी आणि सागरी चाचेगिरीविरोधात एकतेचे प्रदर्शन घडविणे, हा या सरावाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: pakistan committed to coastal freedom