पाकमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद- देशात सार्वजनिक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास पाकिस्तान उच्च न्यायालयाने आज (सोमवार) बंदी घातली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'वर बंदी घालावी या मागणीसाठी अब्दुल वहिद यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पाकिस्तानमध्ये चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भात सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मोहिम हाती घेण्यात आली आहे. युवकांनी समर्थन करत व्हॅलेंटाईन डे मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

'व्हॅलेंटाईन डे' मुस्लिम धर्माच्या विरोधात असल्याने त्यावर तत्काळ बंदी घालण्यात यावी, असे अब्दुल वहिद यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्हॅलेंटाईन डेला बंदी घालण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये दरवर्षी 'व्हॅलेंटाईन डे' मोठ्या उत्साहात साजरा केला होता. परंतु, न्यायालयाने बंदी घातली असल्यामुळे यंदा साजरा करता येणार नाही.

Web Title: Pakistan court bans Valentine's Day celebrations