भ्रष्टाचारप्रकरणी नवाज शरीफ यांना 10 वर्षांचा कारावास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

'एव्हेनफिल्ड' भ्रष्टाचारप्रकरण-लंडनमधील पॉश एव्हेनफिल्ड हाऊसमध्ये चार फ्लॅट्सची मालकी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 'एव्हेनफिल्ड'प्रकरणी भ्रष्टाचाराचे तीन खटले शरीफ आणि त्यांच्या मुलांविरोधात 'नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरो'ने (एनएबी) दाखल करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले असून, त्यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आज (शुक्रवार) सुनावली आहे. तीनपैकी एका भ्रष्टाचारप्रकरणात 'पनामा पेपर्स'प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबतची सुनावणी न्यायालयाने यापूर्वी चौथ्यांदा पुढे ढकलली होती. 'एव्हेनफिल्ड' भ्रष्टाचारप्रकरण-लंडनमधील पॉश एव्हेनफिल्ड हाऊसमध्ये चार फ्लॅट्सची मालकी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 'एव्हेनफिल्ड'प्रकरणी भ्रष्टाचाराचे तीन खटले शरीफ आणि त्यांच्या मुलांविरोधात 'नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरो'ने (एनएबी) दाखल करण्यात आले आहेत. 

या भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांना यापूर्वी सुमारे 688 कोटी तर त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना सुमारे 180 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan court sentences ousted PM Nawaz Sharif to 10 years imprisonment in corruption case