भारत आमची प्रतिमा मलीन करतोय : पाकिस्तान

पीटीआय
रविवार, 25 सप्टेंबर 2016

इस्लामाबाद : ‘‘पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे‘ असा अपप्रचार करून नरेंद्र मोदी काश्‍मीरवरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत,‘ अशा शब्दांत पाकिस्तानने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) कोझिकोड येथे जाहीर सभेत पाकिस्तानवर थेट टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक प्रसिद्ध करून आपली अधिकृत भूमिका मांडली. 

‘मोदी यांनी पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला,‘ असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. या पत्रकात म्हटले आहे, की ‘जाणीवपूर्वक भडकावणारी विधाने करून भारताचे नेते पाकिस्तानविरुद्ध जागतिक पातळीवर प्रतिमाहनन करण्याची योजना आखत आहेत. पाकिस्तानवरील आरोप सपशेल निराधार आहेत. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अशा प्रकारे राजकीय विधाने करणे दु:खद आहे. काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कर करत असलेल्या अत्याचारांपासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारत असे डावपेच आखत आहे.‘‘ 

दहशतवादी बुऱ्हाण वाणी याचा उल्लेख पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘काश्‍मीरमधील तरुण नेता‘ असा केला. बुऱ्हाण वाणीला ठार मारल्यानंतर काश्‍मीरमध्ये पुन्हा एकदा दडपशाही सुरू झाली आहे, असा दावाही पाकिस्तानने केला.

Web Title: Pakistan cries foul; targets PM Narendra Modi