पाकिस्तानमध्ये कोरोनाची तिसरी लाट, महत्वांच्या शहरांमध्ये कडक लॉकडाउन

Pakistan imposes partial lockdown in some areas
Pakistan imposes partial lockdown in some areas

गेल्या वर्षी चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीचा प्रभाव अद्यापही दिसून येत आहे. काही देशांमध्ये कडक अंमलबजावणी केल्यामुळे आटोक्यात आलेला कोरोनानं काही देशांत आपलं आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. कोरोनाच्या विळख्यात काही देश पुन्हा पुन्हा येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती बिकट होत गेली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत दोन हजार २५३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन लाहोर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद, मुलतान, गुजरानवाला आणि गुजरातमध्ये आजपासून कडक लॉकडाउनचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेला केवळ सूट असणार आहे. सार्वजनिक, खासगी किंवा कोणत्याही ठिकाणी सामाजिक, धार्मिक किंवा इतर हेतूंसाठी सर्व प्रकारच्या मेळाव्यावर संपूर्ण बंदी असेल. बँक्वेट हॉल, कम्युनिटी हॉल आणि मार्केटही या काळात बंद राहतील. 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारनेही लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचं निवेदन जारी केलं होतं. त्यानुसार,  हा लॉकडाऊन  १४ दिवसांचा असणार आहे. दोन आठवड्यानंतर परिस्थितीचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com