पुन्हा "सर्जिकल स्ट्राईक' करु नका: पाकचा इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

या दहशतवादी हल्ल्यांची नीट तपासणी होण्याआधीच भारतीय अधिकारी या प्रकरणी बेजबाबदार विधाने व खोटे आरोप करतात, हे आता नित्याचेच झाले आहे. या हल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचा भारताचा आरोप हा काश्‍मीरमध्ये भारताकडून होत असलेले अत्याचार झाकण्यासाठी केला जात असतो

इस्लामाबाद - जम्मु येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील जैश-इ-मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याची माहिती भारताने दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून भारताला इशारा देण्यात आला आहे. भारताने या दहशतवादी संघटनेवर हल्ला करण्याचे निमित्त दाखवून पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करु नये, असे पाककडून ध्वनित करण्यात आले आहे.

""या दहशतवादी हल्ल्यांची नीट तपासणी होण्याआधीच भारतीय अधिकारी या प्रकरणी बेजबाबदार विधाने व खोटे आरोप करतात, हे आता नित्याचेच झाले आहे. या हल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचा भारताचा आरोप हा काश्‍मीरमध्ये भारताकडून होत असलेले अत्याचार झाकण्यासाठी केला जात असतो,'' असा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

Web Title: pakistan india surgical strike terrorism