पाकमधील दहशतवादी 'फेसबुक'वर सक्रिय

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या 64 पैकी 41 दहशतवादी संघटना "फेसबुक'वर सक्रिय असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले आहे. "फेसबुक'वर विखारी प्रचार करणाऱ्या या संघटनांमध्ये पाकिस्तानी तालिबान आणि लष्करे जांघवी यांचाही समावेश आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या 64 पैकी 41 दहशतवादी संघटना "फेसबुक'वर सक्रिय असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले आहे. "फेसबुक'वर विखारी प्रचार करणाऱ्या या संघटनांमध्ये पाकिस्तानी तालिबान आणि लष्करे जांघवी यांचाही समावेश आहे.

या दहशतवादी संघटना सोशल मीडियातून सर्रास प्रचार करत असल्याने पाकिस्तानमधील अडीच लाख युजर्स या धोकादायक संघटनांपासून केवळ एका "क्‍लिक'च्या अंतरावर असल्याचा इशारा "डॉन' या वृत्तपत्राने दिला आहे. पाकिस्तानमध्ये सुन्नी कट्टरतावादी, शिया कट्टरतावादी, जागतिक दहशतवादी संघटना, बलुचिस्तान आणि सिंधमधील फुटीरतावादी असे विविध गट कार्यरत असून त्यांचे इंटरनेट आणि प्रत्यक्ष लोकांमध्येही संपर्काचे जाळे आहे. या बंदी घातलेल्या संघटनांनी आपल्या नावांमध्ये थोडासा बदल करून फेसबुकवर अकाउंट सुरू केले असून, त्यांच्या अकाउंटला भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे "डॉन'ने म्हटले आहे.

या संघटनांशी संबंधित असलेल्यांचे फेसबुक अकाउंट पाहिले असता त्यांनी उघडपणे मूलतत्त्ववाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचे दिसून येत आहे. या व्यक्तींनी दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांची आणि शस्त्रांची छायाचित्रे "लाइक' केल्याचेही दिसून आले आहे. दहशतवादी संघटनांच्या अकाउंटवरील बहुतांशी मजकूर उर्दूतून असून त्यावर स्थानिक घडामोडींवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. या संघटनांवर कारवाई करण्यास पाकिस्तान सरकार टाळाटाळ करत आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pakistan international news pak terrorist and facebook