पाकः लाइव्ह शोमध्येच दिली बलात्काराची धमकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

इस्लामाबाद- एका वृत्तवाहिनेवरील लाइव्ह शो दरम्यान एका मुल्लाने महिलेला अश्‍लील शिवीगाळ करण्याबरोबरच बलात्काराची धमकी दिल्याची घटना घडली.
वृत्तवाहिनीवर ऑनर किलिंग या विषयावर चर्चा घडविण्यात आली होती. यावेळी चर्चेत निवेदीकेसह महिला अधिकार कार्यकर्ती महिला व अन्य तीनजण सहभागी झाले होते. काही वेळानंतर चर्चा वादग्रस्त होऊ लागली. एका मुल्लाने चालू कार्यक्रमातच महिला अधिकार कार्यकर्त्या मारवी सरमद यांना अश्‍लील शिवीगाळ करत बलात्काराची धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रम संपल्यानंतर सरमद यांनी मारगल्ला पोलिस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी ऑनर किलींगमधून 1100 महिलांना जीव गमवावा लागला आहे.

Web Title: pakistan live show rape crime attack women