पाकिस्तानी तरुणाने घरावर लिहिले 'हिंदुस्तान जिंदाबाद'

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील एका तरुणाने आपल्या घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' असे लिहिल्याने त्याला सोमवारी अटक करण्यात आली. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद शाह असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत सुचना मिळताच साजिदच्या घरावर छापा घातला. त्यावेळी घरातील व्यक्तिंनी साजिदने हा प्रकार केल्याची माहिती दिली.

याचबरोबर साजिदवर भारतातील चित्रपटांचा चांगलाच पगडा असल्याचेही त्याच्या घरच्यांनी म्हटले आहे. तसेच तो सतत भारतीय चित्रपटांची गाणी देखील ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच त्याने सार्वजनिकरित्या भारताची स्तुती करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्टीकरण त्याच्या घरच्यांनी दिले आहे. 

डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी 'हिंदुस्तान जिंदाबाद' असे लिहिलेल्या भिंतीची छायाचित्रे काढून पोलिसांना पाठविली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Man Arrested For Writing "Hindustan Zindabad" On Wall Of His House