पाकमध्ये पत्नीची हत्या करून मंत्र्यांची आत्महत्या 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार दक्षिण विभागाचे पोलिस महासंचालक आझाद खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या काही दिवसांपासून या दांपत्यामध्ये वाद होता. दरखशन पोलिस ठाण्यात दुपारी अडीच वाजता बिजरानी आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळाली.

कराची : पत्नीची हत्या करून सिंध प्रांताचे नियोजन आणि विकासमंत्री मीर हझर खान बिजरानी यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. गुरुवारी बिजरानी यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. 

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार दक्षिण विभागाचे पोलिस महासंचालक आझाद खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या काही दिवसांपासून या दांपत्यामध्ये वाद होता. दरखशन पोलिस ठाण्यात दुपारी अडीच वाजता बिजरानी आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळाली. या दांपत्याचे मृतदेह हे बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आढळून आले.

घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरवात केली, त्यानंतर न्यायवैद्यक पथकाने बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने आणि अन्य पुरावे गोळा केले, असे या पत्रकात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan minister Mir Hazar Khan Bijarani committed suicide after killing wife