ईश्वरनिंदा करणाऱ्याला पाकमध्ये फाशीची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

लाहोर: ईश्वरनिंदा करणारा मजकूर फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या शिया समुदायातील व्यक्तीला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सोशल मीडियावर ईश्वरनिंदा केल्याबद्दल फाशीची शिक्षा होण्याची ही पाकिस्तानातील पहिलीच वेळ आहे.

सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा ही सर्वोच्च आहे. पाकिस्तानात मागील वर्षी या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यातील तैमूर रझा (वय 30) याला दहशतवाद विरोधी न्यायालयाने शनिवारी ईश्वरनिंदा करणारा मजकूर फेसबुकवर प्रसिद्ध केल्याबद्दल दोषी धरत फाशीची शिक्षा सुनावली. फेसबुकवर तैमूर याने आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबाबत त्याच्या कार्यालयीन सहकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

ईश्‍वरनिंदाप्रकरणी पाकिस्तानात आत्तापर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सुमारे 97 टक्के लोकसंख्या मुस्लिम असलेल्या पाकिस्तानात ईश्वरनिंदा करणे हा अतिशय संवेदनशील विषय मानला जातो. त्याविरोधात अतिशय कठोर कायदे आहेत. मात्र, या कायद्यांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांकडून करण्यात येतो. सायबर गुन्ह्यांसंदर्भातील वादग्रस्त कायद्याला मागील वर्षी पाकिस्तानात मंजुरी देण्यात आली होती.

Web Title: pakistan news Blasphemous and punishment