शरीफ यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था
सोमवार, 4 डिसेंबर 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करणारी शरीफ यांची याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

पाकिस्तानातील भ्रष्टाचारविरोधी विभागाने "पनामा पेपर्स'प्रकरणी शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात आठ सप्टेंबर रोजी गैरव्यवहारप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. या तीन प्रकरणांची सुनावणी एकत्रित घेण्याची मागणी शरीफ यांनी न्यायालयात केली होती. मात्र, भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या विशेष न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यास शरीफ यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने आज शरीफ यांची याचिका फेटाळून लावली. तसेच, या प्रकरणी विस्तृत आदेश नंतर दिला जाईल, असे स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan news The court rejected nawaz sharifs plea