भारताबरोबरचे प्रश्‍न चर्चेतून सोडविण्याची पाकची इच्छा : सरताज अझीझ

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

इस्लामाबाद: भारताबरोबर मतभेद असलेलेल्या सर्व मुद्यांवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याची आमची इच्छा असल्याचे मत पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताझ अझीझ म्हणाले की, विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व मुद्यांवर भारताशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मतभेद असलेल्या विषयांमध्ये चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याला प्राधान्य दिले जाईल.

भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अझीझ यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून तणाव वाढवला जात आहे. काश्‍मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून, त्यापासून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने भारताकडून तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही अझीझ यांनी केला. पाकिस्तानातील एका स्थानिक वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारताकडून वर्षभरात नियंत्रण रेषेवर 450 वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून काश्‍मीरसह इतर सर्व मुद्यांवर चर्चेद्वारे मार्ग काढण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे अझीझ या वेळी म्हणाले. काश्‍मिरी नागरिकांना जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत काश्‍मिरी जनतेला पाकिस्तानचा राजकीय, नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा कायम असेल, असे अझीझ म्हणाले.

Web Title: pakistan news india-pakistan relationship and sartaz aziz