'जेआयटी'चा अहवाल घटनाबाह्य अन्‌ पक्षपाती

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वकिलांचा दावा

इस्लामाबाद: "पेनामा पेपर्स'प्रकरणी अडचणीत सापडलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वकिलांच्या पथकाने संयुक्त चौकशी पथकाचा (जेआयटी) अंतिम अहवालच घटनाबाह्य आणि पक्षपाती असल्याचा दावा केला आहे. "जेआयटी'च्या अंतिम अहवालात शरीफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, या प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून पुन्हा सुरवात झाली आहे.

शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैशांची अफरातफर केली असल्याचे "जेआयटी'च्या अंतिम अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, "जेआयटी'चा अहवाल घटनाबाह्य आणि पक्षपाती असल्याचा दावा शरीफ यांच्या वकिलांनी केला आहे. शरीफ यांच्या वकिलांनी आज "जेआयटी'च्या अहवालावर आपले म्हणणे मांडले. "जेआयटी'चा अहवाल हा बेकायदा असून, तो घटनाबाह्य असल्यामुळे त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही, असे त्यात म्हटले आहे. तसेच, "जेआयटी'ने परकी देशांकडून प्राप्त केलेल्या कागदपत्रांनाही शरीफ यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. "जेआयटी'च्या विनंतीनुसार अहवालातील गोपनीय ठेवण्यात आलेला दहावा भाग उपलब्ध करून देण्याची मागणीही शरीफ यांच्या वकिलांनी केली आहे.

पाकिस्तान सरकारतर्फे अर्थमंत्री इशाक दार यांनी "जेआयटी' अहवालावरील आक्षेप सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केले आहेत.

विरोधकांनी मात्र "जेआयटी'च्या अहवालाची सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: pakistan news jit panama papers and nawaz sharif