सुनावणीस हजर राहण्यासाठी शरीफ यांना नव्याने समन्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानचे हकालपट्टी केलेले पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांना पुढील आठवड्यात सुनावणीला हजर राहण्यासाठी पाकिस्तानच्या न्यायालयाने नव्याने समन्स बजावले आहे. शरीफ आणि त्यांची मुले सध्या लंडनमध्ये आहेत. भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सुनावणीस ते गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स प्रकरणात त्यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलै रोजी त्यांची पंतप्रधानपदी राहण्यास लायक नसल्याचे म्हटले होते.

न्यायालयासमोर आज पहिली सुनावणी होती. त्या वेळी न्यायालयाने शरीफ त्यांची मुलगी मरियम, मुले हसन आणि हुसेन तसेच जावई महंमद सफदर यांना समन्स बजावले. सुनावणीस शरीफ यांचे राजकीय सल्लागार असिफ किरमानी उपस्थित होते. माजी पंतप्रधान शरीफ यांची पत्नी कुलसूम शरीफ या घशाच्या कर्करोगाने आजारी असून, त्यांना उपचारासाठी लंडनमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे शरीफ हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत लंडनमध्ये गेले असून, लवकरच ते परततील. याची माहिती मी न्यायालयाला दिली आहे, असे किरमानी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.

किरमानी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. त्या सुनावणीस हजर राहण्यासाठी न्यायालयाने शररीफ आणि त्यांच्या मुलांना लंडनच्या पत्त्यावर समन्स बजावले. दरम्यान, नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्यूरो (एनएबी) ने शरीफ आणि अर्थमंत्री इसाक दर यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे आणखी चार दावे दाखल केले आहेत. या खटल्यांचा निकाल सहा महिन्यांत लावण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना केली आहे.

Web Title: pakistan news nawaz sharif and court