पाकिस्तानी निर्यातदारांना चीन देणार करसवलत?

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि चीनने द्विपक्षीय व्यापारी करारामध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. या करारान्वये पाकिस्तानातील निर्यातदारांना "आसिआन' देशांतील निर्यातदारांप्रमाणेच करामध्ये सूट मिळू शकेल.

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि चीनने द्विपक्षीय व्यापारी करारामध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. या करारान्वये पाकिस्तानातील निर्यातदारांना "आसिआन' देशांतील निर्यातदारांप्रमाणेच करामध्ये सूट मिळू शकेल.

चीन "आसिआन'मधील व्यापारी भागीदार असणाऱ्या देशांना अशाप्रकारची विशेष सूट देतो. सुधारित "चीन आणि पाकिस्तान मुक्त व्यापार करारावर-2006' मध्येच उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, आता पुन्हा या करारामध्ये सुधारणा होऊन पुढील महिन्यामध्ये त्यावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. इस्लामाबादमध्येच यासाठी एका औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. या करारामध्ये सुधारणा करण्यासंबंधीची चर्चा 2012 मध्ये सुरू झाली होती. द्विपक्षीय व्यापारात निर्माण झालेला असमतोल लक्षात घेता यामध्ये सुधारणा केली जावी असा आग्रह पाकिस्तानने धरला होता. या दोन्ही देशांतील व्यापाराची तूट लक्षणीयरीत्या वाढली असून ती 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 8.9 अब्ज डॉलरवर पोचली असल्याचे "स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तान'ने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाकिस्तानने चीनमधून 5.4 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात केली होती, पण निर्यात मात्र केवळ 0.78 दशलक्ष डॉलरची होती. चीनमधून यंत्रांची मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आल्याने ही व्यापारी तूट निर्माण झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan news pakistan export china tax