पाकिस्तानचे भारताला समन्स

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

तीन नागरिक ठार झाल्याचा दावा; शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप

इस्लामाबाद: प्रत्यक्ष ताबा रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने आणि भारताकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याने पाकिस्तान गोंधळून गेला आहे. त्यामुळे भारताने केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पाकिस्तानने याप्रकरणी भारताला समन्स बजावले आहे. तसेच तीन नागरिक जखमी झाल्याचेही म्हटले आहे.

दक्षिण आशिया आणि सार्कचे महासंचालक मोहंमद फैजल यांनी भारतीय उच्चायुक्त जे. पी. सिंह यांना समन्स बजावले असून, भारताने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत निषेध केला आहे. या गोळीबारात तीन पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याचे म्हटले आहे. दहा आणि बारा जून रोजी चिरीकोट आणि हॉट स्प्रिंग सेक्‍टर भागात गोळीबार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. 2003 च्या शस्त्रसंधी कराराचा भारताने आदर करावा, अशी अपेक्षा महासंचालकांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ शांतता राखली जावी आणि या गोळीबाराची चौकशी करावी, असे पत्रात म्हटले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील जंड्रॉट आणि हॉट स्प्रिंग सेक्‍टरमध्ये आजही भारताने गोळीबार केल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. त्यात तीन आणखी नागरिक जखमी झाल्याचे नमूद केले आहे. प्रत्युत्तरादाखल भारतीय चौक्‍यांवर पाकिस्तानने गोळीबार केल्याचा दावा पाकिस्तान सैन्याने केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवसांत पाच वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. याअगोदर काल पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी दहाच्या सुमारास प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ भीमबेर गली सेक्‍टर परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या वेळी पाकिस्तानकडून लहान आणि ऑटोमेटिक शस्त्राने गोळीबार करण्यात आला होता.

Web Title: pakistan news Pakistan summons to India