पनामा पेपर गैरव्यवहार प्रकरण: दर भ्रष्टाचारविरोधी न्यायालयासमोर हजर

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

इस्लामाबाद : पाकिस्तानचे अर्थमंत्री आणि पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे निकटवर्ती इशाक दर आज पनामा पेपर गैरव्यवहारप्रकरणी सातव्यांदा भ्रष्टाचारविरोधी न्यायालयासमोर हजर झाले. राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयाने दर यांना आपल्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमविल्याबद्दल गेल्या महिन्यात दोषी ठरविले होते.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे अर्थमंत्री आणि पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे निकटवर्ती इशाक दर आज पनामा पेपर गैरव्यवहारप्रकरणी सातव्यांदा भ्रष्टाचारविरोधी न्यायालयासमोर हजर झाले. राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयाने दर यांना आपल्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमविल्याबद्दल गेल्या महिन्यात दोषी ठरविले होते.

आज झालेल्या सुनावणी दरम्यान राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोच्या (एनएबी) फिर्यादीने दर यांच्या विरुद्ध दोन साक्षीदार सादर केले, असे वृत्त डॉनने दिले आहे. पनामा पेपरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 28 जुलैच्या निर्णयानंतर एनएबीने आठ सप्टेंबर रोजी दर यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषी ठरविले होते. सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना अयोग्य घोषित करीत त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याशिवाय शरीफ यांचा मुलगा मरयम, हुसेन आणि हसन त्याशिवाय जावई मुहंमद सफदर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील पहिले साक्षीदार संसद मार्गावरील एका खासगी बॅंकेचे व्यवस्थापक अब्दुल रहमान गोंडल यांची साक्ष झाली. त्यानंतर दर यांचे वकील ख्वाजा हरीस यांनी त्यांची उलटतपासणी पूर्ण केली, असे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. गोंडाल यांनी दर यांच्या बॅंक खात्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी न्यायालयाला सांगितले, की एनएबीने आपल्याला 16 ऑगस्ट रोजी कागदपत्रांसह हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. त्यानंतर आपण सर्व कागदपत्रं दर यांच्या चौकशी अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली.

दर यांचे 25 मार्च 2005 ते 16 ऑगस्ट 2017 पर्यंतचे बॅंकेचे स्टेटमेंट आपण एनएबीकडे सोपविले आहे. साक्षीदाराने दिलेला बॅंक व्यवहारांचा तपशील न्यायालयाने केस रेकॉर्डचा भाग केले होते, असे या वृत्तात म्हटले आहे. न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणी दरम्यान आणखी कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले. दुसरे साक्षीदार असलेले खासगी बॅंकेतील ऑपरेशन व्यवस्थापक मसूद घानी यांनी बॅंकेच्या रेकॉर्डविषयी साक्ष दिली. त्यांची उलटतपासणी आज पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास न्यायालयाने सांगितले. येत्या 30 ऑक्‍टोबरपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली.

Web Title: pakistan news panama papers and court