पाकच्या पंतप्रधानांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

सोशल मिडीयात प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत शाहिद अब्बासी यांची जॉन एफ केनेडी विमानतळावर सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून चौकशी करण्यात येत आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला अशा प्रकारे अमेरिकेत चौकशीला सामोरे जावे लागल्याची ही पहिली घटना नाही. 

वॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांची सुरक्षेच्या कारणास्तव कपडे उतरवून चौकशी केल्याची घटना समोर आली आहे. या चौकशीचा व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे.

सोशल मिडीयात प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत शाहिद अब्बासी यांची जॉन एफ केनेडी विमानतळावर सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून चौकशी करण्यात येत आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला अशा प्रकारे अमेरिकेत चौकशीला सामोरे जावे लागल्याची ही पहिली घटना नाही. 

शाहिद अब्बासी गेल्या आठवड्यात आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. या दौऱ्यात ते अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेंस यांनाही भेटले होते. अब्बासी यांच्या अशा चौकशीबद्दल पाकिस्तानी माध्यमांकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. खासगी दौऱा असला तरी पंतप्रधानांची अशी चौकशी होणे देशासाठी शर्मनाक असल्याचे पाक माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेने यापूर्वीच पाकिस्तानवर अनेक निर्बंध आणले आहेत.

Web Title: Pakistan PM shahid Khaqan Abbasi put through security check in US