बनावट ओळखपत्रप्रकरणी 'अफगाण गर्ल'ला अटक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

कराची : नॅशनल जिओग्राफी वाहिनीवरील 'अफगाण गर्ल' नावाने परिचित असलेला चेहरा अर्थात शरबत बिबीला बनावट ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी पाकिस्तानातील पेशावरमध्ये अटक करण्यात आली. 

शरबत बिबीकडे अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या अधिवासाची बनावट ओळखपत्रे होती. पाकिस्तानातील कायद्यानुसार तिच्यावर विविध कलमे लावली आहेत. शरबत बिबीची छायाचित्रे नॅशनल जिओग्राफरचा छायाचित्रकार स्टिव्ह मॅक क्‍युरी याने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची जगभर प्रशंसा करण्यात आली होती. त्यानंतर शरबत बिबीला 'अफगाण गर्ल' नावाने ओळखले जाऊ लागले. 

शरबत बिबीसोबत आणखी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे जण शरबत बिबीची मुले असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानात अफगाणिस्तानातील निर्वासीतांची संख्या जवळपास 3 दशलक्ष इतकी असून, त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यापैकी अनेक जणांची नाव नोंदणी झाली नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र 'डॉन'ने दिले होते. 

कशी झाली अफगाण गर्ल 
मॅक क्‍युरी याने पेशावर येथील नासिर बाघ येथील निर्वासीतांच्या छावणीमध्ये शरबत बिबीचे छायाचित्र काढले होते. या छायाचित्राला अमाप प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे, तर लिओनार्डो द विंचीच्या 'मोनालिसा'च्या छायाचित्रासोबत या चित्राची तुलना केली होती. 2002 मध्ये मॅक क्‍युरीने शरबत बिबीला पुन्हा शोधून काढले. 2002 मध्ये तिची छायाचित्रे अफगाणिस्तानातील सोव्हियत युद्धांचे प्रतिनिधित्व करणारी होती. 

Web Title: Pakistan police arrest Afghan Girl in fraud case