50 हजारात मुलगा घ्या! पाकिस्तानच्या पोलीसाची भररस्त्यात मुलांची विक्री | Pakistan Police Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

50 हजारात मुलगा! पाकिस्तानच्या पोलीसाची भररस्त्यात मुलांची विक्री

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमधील (pakistan police viral video) एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात २ लहान मुलांना घेऊन पाकिस्तानमधला एक पोलीस कर्मचारी भररस्त्यात मुलांची विक्री करण्यासाठी उभा होता. ५० हजार रुपयांमध्ये मुलांची विक्री करण्याच्या घोषणा तो देत होता. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातला हा व्हीडिओ असल्याचं कळतंय. नेमकं काय आहे प्रकार...?

....अन् पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या मुलांनाच विक्रीला काढलं.

मुलांना विकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी ओरडून सांगत आहे की, या मुलाची किंमत 50 हजार(पाकिस्तानी) रुपये आहे, माझ्या मुलांना विकत घ्या. त्या पोलिसाचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित लोकही त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत आहेत.स्वतःची मुले विकायला काढली. या व्हिडीओतील व्यक्ती निसार लाशरी असून तो कारागृह विभागाचा कर्मचारी आहे. मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्या उपचारासाठी रजा मागितली असता, वरिष्ठांनी लाच मागितल्याचा आरोप या कर्मचाऱ्याचं केलाय. पुढे लाच दिली नाही म्हणून वरिष्ठांनी त्यांची ७५ मैल म्हणजेच सुमारे १२० किमी अंतरावरील लार्कना शहरात बदली केली. त्यामुळे अखेर वरिष्ठांना लाच देण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या मुलांनाच विक्रीला काढलं.

हेही वाचा: कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणाले? | Farm Law Repeal

लाच दिली नाही म्हणून......

निसार लाशारी हा घोटकी कारागृहात तैनात होता. या कृत्याबाबत सांगताना लाशारी म्हणाला की, आता मला समजत नाहीये की मी लारकानाला नोकरी करायला जावं की मुलाच्या ऑपरेशनसाठी, इथे थांबावं", माझा मुलगा आजारी आहे, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी मला रजा हवी होती. पण, वरिष्ठांनी रजा देण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

हेही वाचा: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण - शरद पवार

loading image
go to top